अर्थ : एखाद्या गोष्टीची किंवा विषयाची मिळणारी माहिती.
उदाहरणे :
त्याला संस्कृतचे चांगले ज्ञान आहे.
माणसाला आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान असले पाहिजे
समानार्थी : ज्ञान
अर्थ : एखाद्या विषयाचे ज्ञान किंवा परिचय करून देण्यासाठी सांगितलेली गोष्ट.
उदाहरणे :
हवामान खात्याने चक्रीवादळासंबंधी माहिती दिली
अर्थ : अवगत असण्याची अवस्था वा भाव.
उदाहरणे :
हे काम त्याच्या माहितगारीत झाले आहे
समानार्थी : माहितगारी
माहिती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maahitee samanarthi shabd in Marathi.